मेष : सध्या बरेच काम करण्याची इच्छा असेल; परंतु सभोवतालच्या बदलामुळे साशंक व्हाल. व्यवसायात हवे तसे सहकार्य न मिळाल्याने काही कामे मागे पुढे होतील. माणसांची खरी पारख होईल. व्यवहारात गिऱ्हाईकांशी बोलताना जरा जपून. नोकरीत वरिष्ठांना नजरचुकीने विसरलेल्या कामाची आठवण येईल. खरे हितचिंतक कोण हे ओळखण्याची संधी मिळेल. घरात खर्च वाढेल. हौसमौजेसाठी सढळ हात राहील. तरुणांच्या मतांना विरोध होईल. तरुणांनी भावनाउद्रेक टाळावा
वृषभ : नवीन वर्तुळ सभोवताली निर्माण होईल. त्यामुळे जुने हितसबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कार्यपद्धतीचा अवलंब कराल. नवीन योजना हाती घ्याल. मात्र त्याची वाच्यता लगेचच करू नका. नोकरीत बदली किंवा बदल हवा असल्यास प्रयत्न करा. जोडधंद्यातून विशेष लाभाची शक्यता. घरात तत्त्विक मतभेद होण्याची शक्यता. तरी डोके शांत ठेवा. उगीचच नातेसंबंधात गैरसमज होणार नाहीत, याची दक्षता घ्या.
मिथुन : प्रगतीपथावर राहण्यासाठी इतरांच्या कलाने काम करून घेण्याची खुबी आत्मसात केलीत तर कामांना विलंब होणार नाही. व्यवसायात कुणालाही न दुखवता हेतू साध्य करा. स्पर्धकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. बाजारातील चढउताराचा अंदाज घेऊन कृती करा. नोकरीत मौजमजेच्या वेळी सहकारी तुमच्याबरोबर असतील. मनाप्रमाणे काम करण्याची मुभा मिळेल. घरात रुसवे फुगवे होतील. तरी जास्त विचार न करता क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास फायदा तुमचाच आहे.
कर्क : सध्या परस्परविरोधी ग्रहमान आहे. त्यामुळे तुम्ही येथे संभ्रमात पडाल. व्यवसायात पैशाची आवक समाधानकारक असेल. मात्र हमी असलेल्या पैशाची गुंतवणूक करताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. पैशाचा विनियोग योग्य मार्गाने होईल याची दक्षता घ्यावी. नोकरीत कामात वरिष्ठांच्या सूचनांमुळे निर्बंध येतील. हातून चुका होणार नाही याची काळजी घ्या. नवीन ओळखी होतील त्या जोपासा. घरात वातावरण बदलते राहील तरी मौनव्रत बाळगावे हे उत्तम.
सिंह : माणसांवर विश्वास ठेवून काम करण्याची रास असल्याने तुम्हीही तीच अपेक्षा सभोवतालच्या व्यक्तींकडून कराल. परंतु त्याची विश्वासार्हता पडताळून पाहा. व्यवसायात बाजारातील चढ-उतारांवर बारीक लक्ष ठेवा. काही कारणाने जुने हितसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्या वागण्या बोलण्याने वरिष्ठांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. काम बरे की आपण बरे हे धोरण अंगीकारा. हे धोरण उपयोगी पडेल.
कन्या : सध्या तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे अनुभव येतील. व्यवसायात तुमच्या कामाचा उत्साह प्रचंड असेल.जेवढे काम कराल तेवढे थोडेच असेल. आर्थिकस्थिती समाधानकारक असेल. नोकरीत कामानिमित्त जादा अधिकार मिळतील. नवीन ओळखी होतील. पगारवाढीची शक्यता आहे. नातेवाईंकाचा सहवास लाभेल. सुवार्ता कळेल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांना त्यांच्या क्षेत्रात प्राविण्य मिळेल.
तुळ : व्यावसायिक समाधान देणारा सप्ताह आहे. व्यवसायात विविध मार्गांनी पैशाची आवक होईल. कामात बदल करून सुधारणा करावीशी वाटेल. योग्य व्यक्तीची मिळालेली मदत उपयोगी पडेल.नोकरीत पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे मिळतील. प्रतिष्ठा व मान मिळेल. घरात पैशाअभावी रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. सर्वांना मजेत ठेवण्यात यशस्वी व्हाल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.
वृश्चिक : नवीन संक्रमणाची नांदी देणारे ग्रहमान आहे. त्यामुळे भविष्यात प्रगती होईल. व्यवसायात वाढत्या व्यापामुळे कार्यपद्धतीत बदल करण्याचा विचार होईल. कामामुळे सभोवतालचे वर्तुळही बदलण्याची शक्यता. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत किचकट कामातून सुटका झाल्यामुळे निश्वास टाकाल. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. मर्जी संपादन कराल. घरात तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडाल.
धनु : लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल. तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात बरेच मोठे बेत मनात असतील; पण ताळेबंद केल्यावर हे आपल्या आवाक्यातील नाहीत असा प्रत्यय येईल. नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत कामामुळे जादा सवलती मिळतील व अधिकार दिले जातील. वरिष्ठांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. घरात एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वत:ची हौस भागवून घ्याल.
मकर : सभोवतालच्या वातावरणाशी मिळते जुळते घेतल्याने तुम्ही ताजेतवाने व्हाल. व्यवसायात नवीन कामासंबंधी नियोजन सफल होईल. स्पर्धकांपासून आपले बेत गुपित राखा. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करा. नोकरीत आळसाने लांबलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल.कामाचा उबग आल्याने विश्रांती आवश्यक वाटेल. घरात वातावरण आनंदी राहील. मन:शांती मिळेल. कलावंत-खेळाडू स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
कुंभ : प्रगतीची वाटचाल सुकर करणारे ग्रहमान लाभेल. त्यामुळे तुमच्या सुप्त इच्छा आकांक्षा सफल होतील. व्यवसायात तुमच्या आचार विचारांचा व जीवनपद्धतीत बदल होण्याची नांदी. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन पद्धत व नवे तंत्रज्ञान वापरणे गरजेचे होईल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. घरात इतर व्यक्तींच्या इच्छा सफल होतील. आरोग्यात सुधारणा झाल्याने हुरूप वाढेल. घरात ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला पटणार नाही त्यामुळे आडमुठे राहाल.
मीन : प्रकृतीची उत्तम साथ लाभेल. त्यामुळे उत्साह वाढेल. तुमच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा जागृत होतील. व्यवसायात पैशाची आवक चांगली राहिल्याने नवे प्रयोग करावेसे वाटतील. कामामुळे जुने हितसंबंध संपून नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. नोकरीत जोडधंद्यातून कमाई होईल. वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नात सुधारणा होईल. नवीन खरेदीचा आनंद घेता येईल. तरुणांना नवीन दिशा सापडेल.