नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासांत करोनाने देशभरात 50 बळी घेतले असून, 1 हजार 383 नवे रुग्ण आढळले आहेत.
Health Minister @drharshvardhan and I interacted with doctors & representatives of IMA through video conferencing.
The way our doctors are performing their duties in these testing times is exceptional. I urge every Indian to cooperate with doctors in this fight against COVID-19. pic.twitter.com/DCHONTWNs3
— Amit Shah (@AmitShah) April 22, 2020
यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. यामध्ये रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले 3 हजार 870 तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 640 जणांचा अहवाल आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (बुधवार) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आपला विरोध मागे घेतला. यादरम्यान त्यांनी डॉक्टरांच्या मेहनतीचं कौतुकही केलं. तसंच त्यांच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं आणि प्रतिकात्मक विरोधही न करण्याचं आवाहन शाह यांनी डॉक्टरांना केलं. सरकार कायम डॉक्टरांसोबत आहे, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं