प्रशासक समिती बनली कोट्यधीश

रामचंद्र गुहा यांनी मंडळाचे मानधन परत केले : विना अपेक्षा काम केले                                            मुंबई: भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रशासक समितीचे सदस्य असलेले सगळे कोट्यधीश बनले आहेत. अध्यक्ष विनोद राय आणि या समितीतील सदस्य डायना एडलजी यांना 33 महिने प्रशासक म्हणून केलेल्या कामाबद्दल प्रत्येकी 3.5 कोटी इतके मानधन मिळणार आहे.

एकीकडे या समितीतील सदस्य कोट्यधीश होणार आहेत, तर दुसरीकडे प्रसिद्ध क्रीडा इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपले मानधन क्रिकेट मंडळाला परत केले आहे. जर समिती पारदर्शक कारभारासाठी नियुक्‍त करण्यात आली होती, तर ते काम मी कोणतीही अपेक्षा न ठेवता केले, त्यामुळे मानधन घेण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे गुहा यांनी मंडळाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. समितीत नियुक्त झाल्यानंतर गुहा यांनी काही महिन्यांतच समितीचा राजीनामा दिला होता.

राय आणि एडलजी हे 2017 पासून या समितीचे सदस्य होते. रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये हेदेखील सदस्य होते. नंतर त्यांनी राजीनामा दिला. 2017 सालाचे प्रत्येकी 10 लाख आणि नंतरच्या दोन वर्षांसाठी अनुक्रमे 11 व 12 लाख मासिक मानधन त्यांना देण्यात येणार आहे.

जे सदस्य समितीतून बाहेर पडलेले आहेत, त्यांना त्यांनी जितके दिवस काम केले आहे, त्या काळाचे मानधन दिले
जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.