मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोडेगावच्या हद्दीतील पानसरे वस्ती येथील राहत्या घरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला सागर संजय तोत्रे (रा. कुरवंडी), तुषार किसन आसवले (रा. कोटमदरा) मोटार सायकलवरून घेऊन गेले.
या मुलीच्या वडिलांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे- गोरा रंग, उभट चेहरा, उंची पाच फुट दोन इंच, सडपातळ, नेसणीस पिवळ्या व काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस. मराठी भाषा बोलते. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.