पणजी – कॉंग्रेसने गोवा विधानसभेतील आघाडी बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस, गोवा फॉर्वर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाबरोबर आघाडीची चर्चा सुरू केली आहे. कॉंग्रेसचे गोवा विभागाचे प्रमुख दिनेश गुंडुराव यांनी सांगितले की, गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेवरून घालवणे हे आमचे प्रमुख उद्दीष्ट असून त्यासाठी राजकीय समिकरणे जुळवण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.
आमची ही आघाडीची बोलणी यशस्वी झाली तर आम्ही गोव्यात अत्यंत सक्षम आणि ताकदीचे सरकार देऊ असे ते म्हणाले. गोवा फॉर्वर्ड पाटी, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी हे पक्ष गेली पाच वर्षे भाजप प्रणित आघाडीशी संबंधीत आहेत.
जे पक्ष गोव्याचे स्थानिक पक्ष आहेत ज्यांना गोवा काय आहे हे माहिती आहे अशा संघटनांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीत भाजपशी समर्थपणे दोन हात करू असे त्यांनी नमूद केले आहे.