निमसाखर -करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून रात्रंदिवस प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून जमावबंदीचा आदेश असला तरी गॅस खरेदीसाठीही ग्राहक फिरकत नसल्याने गॅसवाल्यालाही रखरखत्या उन्हात ग्राहकांची वाट बघत आहे.
करोना विषाणूचा संसर्ग होत असल्याने जगाबरोबरच भारतासह खुद्द पुणे जिल्ह्यातदेखील याचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला रोखण्यासाठी राज्य, केंद्र सरकारकडुन नागरीकांना घरामध्ये राहण्याच्या सुचना देत जमावबंदीचा आदेश काढला. त्यामुळे नागरीक सार्वजनिक ठिकाणी सध्या निर्मनुष्य झाली आहेत. इंदापूर तालुक्यातील निमसाखर, नीरवांगी, खोरोचीसह अन्य भागांमधील गृहीणींकरीता स्वयंपाक गृहासाठी सध्या गॅससाठी महत्वाचे स्थान आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या करोनाचे गंभीर संकटप्रसंगी आणि प्रशासनाने आणलेल्या जमावबंदी काळात मोठ्या प्रमाणावर सिलेंडर टाक्याच्या खपावर परिणाम झाला आहे. विविध कंपन्यांच्या गॅस गाड्या ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या चौकात एकाच ठिकाणी थांबत असतात.
मात्र सद्य परिस्थितीमध्ये जमाव बंदीच्या भितीपोटी ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नाही? असे अनेक प्रश्न तयार होत आहेत. कुठल्या कारणांनी का होईना पण सध्या परिसरात सिलेंडर टाकीची ग्राहकांकडुन खरेदी होताना दिसुन येत नाही.