करोना प्रादुर्भवामुळे कतरिना कैफने देखील घरात बसून एक मस्त उद्योग केला आहे. तिने चक्क भांडी घासण्याची प्रॅक्टिस केली आहे. एवढेच नव्हे तर तिने होम ऍप्रन बांधून चक्क आपल्या भांडी घासण्याचा एक व्हिडीओ बनवला आहे आणि आपल्या फॅन्सना त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवले आहे. जे लोक भांडी कशी घासायची हे विसरले असतील, त्यांच्यासाठी हे एक ट्युटोरियल आहे, असे सांगून तिने भांडी घासण्याचा स्वतःचा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
आपल्या स्वयंपाकघराच्या बेसिनमध्ये भरपूर भांडी जमा असलेले तिने दाखवले. त्यानंतर डिटर्जंट आणि वॉशिंग ब्रश घेऊन तिने या डिश घासून चक्क विसळल्या. कतरिना कैफच्या बरोबर कार्तिक आर्यननेही भांडी घासायचे प्रात्यक्षिक करून दाखवून दखवले आहे. त्याचाही व्हिडीओ त्याने अपलोड केला आहे, कार्तिक आर्यनची बहिण कृतिका तिवारीने कार्तिकच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला शेअर केले आणि त्याच्या कामाचे कौतुकही केले आहे. कार्तिक आर्यनने आपल्या भांडी घासण्याच्या व्हिडीओबरोबर “कहानी घर घर की’ अशी कॅप्शन दिली आहे. आता वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तमाम पब्लिकला घर बसल्याबसल्या अशी भांडीच घासायला लागली असतील, असा त्याचा थेट मेसेज होता.