पंढरपूर : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोळू येथील प्रदीप ठाकूर व ठाकूर कुटुंबीयांच्या वतीने सावळ्या विठ्ठलचरणी गेली पाच वर्षांपासून आकर्षक अशी सुवासिक पुष्प सजावट केली जाते.
यंदाही त्यांनी केलेल्या विविध फुलांच्या सजावटीने विठ्ठल मंदिर फुलांच्या गंधाने दरवळले होते. दरवर्षी याचा मान विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने ठाकूर कुटुंबीयांना देण्यात येतो.