मुंबई – भारताचा परकीय चलन साठा ९ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ५.२४ अब्ज डॉलर्सने घसरून तो आता ६१७.२३० डॉलर्स इतका झाला आहे. या आठवड्यात सोन्याचा साठा ३५० दशलक्ष डॉलरने घसरून तो ४७.७३९ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.
सन २०२३ या कॅलेंडर वर्षात देशाच्या परकीय चलन साठ्यात एकूण ५८ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. मात्र त्यांच्या आधीच्या वर्षात म्हणजेच सन २०२२च्या कॅलेंडर वर्षात देशाच्या परकीय चलन साठ्यात एकूण ७१ अब्ज डॉलर्स इतकी घट झाली होती.
परकीय चलन साठा हा सामान्यत: राखीव चलनांमध्ये ठेवला जातो. त्या चलनात यूएस डॉलर आणि काही प्रमाणात, युरो, जपानी येन आणि पाउंड स्टर्लिंग या चलनांचा समावेश असतो.
ऑक्टोबर २०२१ मध्ये, देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने सुमारे ६४५ अब्ज डॉलर्स इतका उच्चांक गाठला होता. रुपयाचे प्रचंड अवमूल्यन रोखण्यासाठी आरबीआय वेळोवेळी, तरलता व्यवस्थापनाद्वारे, डॉलरच्या विक्रीसह बाजारात हस्तक्षेप करते.