शिरूर/रांजणगाव गणपती -रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील फंड वस्तीमधील एकोणतीस वर्षीय तरुण करोना पॉझिटिव्ह आढळला, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व रांजणगाव गणपती प्राथमिक रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी महेश सातव यांनी दिली. रांजणगावमध्ये पहिला पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 35 जण क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातील 15 जण हाय रिक्स, तर वीसजण लो रिक्स संपर्कात आलेले आहेत. रांजणगाव येथील थंड वस्ती येथे राहणारा 29 वर्षीय पुरुष नागरिक याचा सतत पुण्याला ये- जा करीत होते.
हा युवक कामानिमित्त (दि.19) पुण्याला गेला असता विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले आहे. युवकाला त्रास होऊ लागल्याने तो रांजणगाव प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी आला होता. तो संशयित वाटल्याने त्याला वाघोली येथील कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवला होता. (दि. 24) त्याचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे.