बॉलीवूड अभिनेत्री रिया सेनने “चुडी जो खानकी हाथों में…’ यासारख्या म्युझिक व्हिडीओंमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गजविले आहे. अभिनयाचा वारसा लाभलेली रिया ही प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री
मुनमुन सेन यांची मुलगी आहे. 1991च्या “विषकन्या’ चित्रपटात पूजा बेदी मुख्य भूमिकेत होती आणि रिया सेनने या चित्रपटात तिच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणाऱ्या रियाने बंगाली, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांसह हॉलीवूडमध्येही काम केले आहे; परंतु सध्या रिया चित्रपटसृष्टीपासून जरा लांबच
आहे. व्यावसायिक यशाबरोबरच तिला “बोल्ड’ असा टॅगही मिळाला आहे. रिया लवकरच “पती, पत्नी और वो’मध्ये झळकणार आहे.
दरम्यान, रियाने 2011 साली बंगाली चित्रपटसृष्टीत आपले करियर सुरू केले. तिने रितुपर्ण घोष यांच्या “नौकाडुबी’ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. यानंतर तिला अनेक बॉलीवूड
चित्रपट मिळाले. सध्या रिया सेन ही आगामी “पती, पत्नी और वो’ या कॉमिडी शोमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे याचे कास्टिंग बंद आहे. या शोबाबत रिया सेन खुपच
उत्सुक आहे.