शेतकऱ्यांना अखेर मोबदला मिळाला

चाकण एमआयडीसी पाचव्या टप्प्यातील भूसंपादनाचा तिढा सुटला

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील अँटो हब ओळखल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्यातील भूसंपदनाबाबतचा तिढा सुटला असून भूसंपादित खातेदारांना मोबदल्याचे धनादेश वाटप शुभारंभ उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी राजगुरुनगर येथे केला.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तेली यांनी मोबदल्याची रक्‍कम वाटपास सोमवार (दि. 16) पासून सुरुवात केल्याने खातेदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

दर्जाच्या कंपन्याची जागेची मागणी होती. त्यासाठी पाचव्या टप्यात सहा गावांची जवळपास 637.271 हेक्‍टर जमीन संपादनाची कार्यवाही सुरु होताच भूसंपादन खातेदार शेतकऱ्यांनी याला विरोध केला. यावर शासनाने सक्‍ती न करता प्रचलित रेडिरेकनरच्या मुल्याकंनानुसार भूसंपादीत शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते एकरी भाव ठरवण्यात आला होता. तसेच शेतकऱ्यांच्या संमतीने कमीत कमी सलग 50 हेक्‍टर क्षेत्र मिळाल्यास संपादनाची कार्यवाही करुन नुकसान भरपाईस मान्यता जमीन मालकांनी दिली होती, त्यानुसार गोनवडी गावच्या हद्दीतील अपेक्षित 79.850 हेक्‍टर जमिनीची मोजणी करण्यात येऊन पैकी 68.21 हेक्‍टरचे निवाडे करण्यात आले. चाकण, वाकी खुर्द, गोनवडी येथे एकरी 65 लाख रुपये शासनाने दर जाहिर केला, तर आंबेठाण, बिरदवडी आणि रोहकल येथे एकरी 55 लाख रुपयांचा दर मिळणार आहे.

गोनवडी, रोहकल गावाची हद्दीतील मोजणी होऊन गोनवडी गावातील भूसंपादनाचे निवाडे काढण्यात आले. त्यानुसार मोबदला वाटप करण्यास सुरुवात करण्यात येऊन औपाचारिक रित्या याचा शुभारंभ प्रांत संजय तेली यांच्या हस्ते खातेदार शेतकऱ्यांसमवेत करण्यात आला. यावेळी गोनवडी गावचे संपादित लाभधारक शेतकरी अविनाश कुलकर्णी, गणेश डुबे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची आचासंहिता सुरू झाली, तरी आम्हाला मोबदला वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. याबाबत वरीष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला असून मार्गदर्शन मागितले असल्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

पाचव्या टप्प्यातील सर्व भूसंपादित खातेदार मालकांच्या नावे निर्धारित मोबदला रक्‍कम बॅंकेच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
– संतोष चव्हाण, नायाब तहसीलदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)