महापालिकेतील अभियंते भ्रष्टाचाराने बरबटलेले

राठोड : अभियंत्यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणी
नगर- राजकीय दादागिरीमुळे संरक्षणाची मागणी महापालिकेतील अभियंत्यांनी केल्यानंतर आज शिवसेनेने या अभियंत्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करून हे अभियंते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्यामुळे हे संरक्षणाची मागणी करीत आहेत. कर नाही त्याला डर कशा पाहिजे, असा सवाल करून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड म्हणाले की, अभियंत्यांच्या कारभाराची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ही माहिती मिळाल्यानंतर दोन ते चार अभियंते तुरूंगात जातील. या अभियंत्यांची खातेनिहाय चौकशीची मागणी लोकायुक्‍तांकडे करण्यात येणार असल्याचे राठोड म्हणाले.

महापालिकेतील अभियंत्यांनी राजकीय दादागिरी होत असल्याने संरक्षण देण्याची मागणी महापालिका आयुक्‍तांकडे केली. आमच्यावर विविध मार्गाने दडपण, दादागिरी व दहशत केली जात आहे. आमच्याविरुद्ध हस्ते- परहस्ते खोटी प्रकरणे तयार करणे, माहिती मागविणे, तक्रारी देणे या आंदोलने करण्यासारखे प्रकार होण्याची शक्‍यता असल्याने आम्ही भीतीच्या सावटाखाली आहोत, अशी तक्रार अभियंत्यांनी केली. त्यानंतर आज शिवसेनेने थेट अभियंत्यांना लक्ष्य केल्याने आता महापालिकेत नवा संघर्ष सुरू झाला आहे.

राठोड म्हणाले की, खोटीनाटी प्रकरणे तयार करून नगरकरांची दिशाभूल करून अभियंते पैसा कमवितात. याला शहरातील काही राजकीय नेत्यांचाही वरदहस्त आहे. अभियंत्यांमुळे नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. महापालिकेतील या अभियंत्यांचे दहशतीचे विधान म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा. शहरात कचरा, नालेसफाई, पाणी, रस्ते या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मनपातील अभियंते दबाब होत आहे असे सांगून चुकीच्या कामापासून सुटका करीत आहेत. याला जबाबदारी ते स्वतः आहेत. कर्तव्याचा पगार घेतात अन्‌ लबाडी करून पैसे कमवितात. तुम्हाला जाब विचारण्याचा नागरिक या नात्याने अधिकारी आहे. अनेक वर्षापासून एकाच खात्यामध्ये काम करतात. कामासाठी अधिकाऱ्यांनी एकजुट दाखविली पाहिजे. जनतेच्या पैशातून मोठा भ्रष्टाचार होत असून या अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी होण्यासाठी लोकायुक्‍तांकडे तक्रार करणार असल्याचे राठोड म्हणाले.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, अभियंत्यांची अनेक प्रकरणे शिवसेनेकडे आली आहे. बिलांमध्ये अनेक धक्‍कादायक प्रकार उघडकीस येणार आहेत. 5 रुपयांची खुर्चीचे भाडे बारा रुपये दाखविण्यात आले आहे. उमेदवारांना बॅच एक रूपयात मिळतो. तो 75 रुपये दाखविण्यात आला आहे. शिवसेना या अभियंत्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत त्यांचे पितळ उघडे करणार आहे. एक अभियंता कमरेला पिस्तूल लावून टपऱ्याचालकांसह नागरिकांवर दशहत करीत आहे. त्यामुळे या प्रकरणची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापौरांनी पैसे घेऊन केली बल्लाळ यांची बदली

अभियंता बल्लाळ यांच्या बदलीसाठी महापौरांनी पाठपुरावा केला. बल्लाळ यांच्यामुळे निम्मे नगर शहर अंधारात आहे. असे असतानाही त्यांची बदली करण्यासाठी महापौर आग्रह आहेत. पैसे घेवून महापौर जर बदली करणार असतील तर हे भाजपला अभिप्रेत नाही. असा आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)