मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘रणदीप हुडा’ आपल्या एका जुन्या व्हिडीओमुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. सध्या सोशल मीडियावर रानदीपचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकरी सुद्धा त्याच्यावर भडकले आहे.
रानदीप हुडाने त्याच्या या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो ‘मायावती’ यांचं नाव घेत एक आक्षेपार्ह शब्द वापरू थट्टा केली आहे.
दरम्यान, त्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मायावती यांचे समर्थक भडकले असून, त्यांनी तात्काळ रणदीप हुडाला अटक करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाला रणदीप आपल्या व्हिडिओमध्ये…
रणदीप यावेळी म्हणतो.. मी तुम्हा एक ‘डर्टी ज्योक’ सांगतो “मायावती दोन मुलांसह जात असतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारतो की, ‘ही जुळी मुलं आहेत का?’ त्यावर मायावती म्हणतात नाही, ‘एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा.’ यानंतर रणदीप हुडा जे म्हणाला ते अनेकांना अजिबात आवडलं नाही.