मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले रातोरात गायब केले असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच, सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत “हिंमत असेल तर मला अटक करा,” असे म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना, “मी पुराव्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. यांनी केलेले घोटाळे याचा हिशोब चार्टड अकाउंटंट किरीट सोमय्या जनतेचा ऑडीटर बनून. आता रश्मी ठाकरेंचे १९ बंगले? आता जानेवारी २०१९ मध्ये रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला, उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये त्याचं टॅक्सेसचं पेमेंट केले , असे त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंचे सरपंच मिसाळ हे मी ज्यावेळी २०२० मध्ये गेलो होतो, त्यावेळी सांगतात, आहेत बंगले. पैसे घेतायत त्यात तुझं काय? असं म्हणत काय शिव्या दिल्या होत्या मला त्यावेळी. परवा देखील सकाळी त्याने वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आणि सांगिलं की आहे बंगले आणि दुपारनंतर दुसऱ्या वृत्तवाहिनीशी बोलतान म्हणतो बंगले नाहीत. मग मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी ते पाडले असतील तर मला माहिती नाही.”
तसेच, “चहावाल्यानंतर चाळवाला… आता योगेंद्र, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हेल्थकेअर सोबत आणखी एक बोगस कंपनी काढली होती. त्याचं नाव होतं इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्विसेस आणि त्याचं नाव होतं लाईफलाईन हेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस. त्यामध्ये तो राजीव चहावाला आणि इथे ही कंपनी योगेंद्र चाळवाला जो परत आज चाळ नंबरमध्ये कुठल्यातरी खोलीत, त्याचा रुम नंबर १७ बी दादाभाई चाळ, परळ. सगळ्यात मजेदार बाब अशी आहे की, संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर हे कोविड सेंटरसाठी स्वत: दोन बेनामींना पुढे घेऊन, अर्ज करायचे. एक लाईफलाईन हेल्थ केअर आणि दुसरं इटर्नल हेल्थ केअर म्हणजे महापालिकेचा, ठाकरे सरकारच्या चोपड्यामध्ये या सेंटरसाठी दोघांचा अर्ज आला आहे, स्पर्धा आहे असं दिसायचं आणि दोघांमधून एक निवडलं जायचं.” असेही सोमय्या यांनी सांगितले.
तसेच, “आणखी मजेदार बाब अशी आहे की, दोघांमध्ये सुजीत आणि तेच पार्टनर तेच सगळे, एकामध्ये सीईओ चहावाला दुसऱ्यामध्ये सीईओ चाळवाला. दुसरी कंपनी इटर्नल हेल्थ केअर जी आहे, ही फसवणूक केली आहे. त्याच्या वकीलाने, सुजीत पाटकर इटर्नल हेल्थकेअरच्या वकीलाने पोलिसात लेखी तक्रार दिली आहे की, माझी स्वाक्षरी फोर्ज करण्यात आली आहे. म्हणजे संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर काय काय उद्योगधंदे करतात. लबाडी, घोटाळा आणि फसवणूक उद्धव ठाकरे तुम्ही कारवाई केव्हा घेणार आहात? किरीट सोमय्यावर आता १८ वा खटला, मी जाणार आहे उद्या छगन भुजबळची बेनामी संपत्ती, छगन भुजबळांचा घोटाळा मी उघड केला. भुजबळांना दोन वर्षे तुरुंगात रहावं लागलं. आता सत्तेत आले तर त्या बेनामी संपत्तीची पाहणी करायला किरीट सोमय्या गेले तर किरीट सोमय्याला लगेच नोटीस. मी उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर करा मला अटक.” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं.