मुंबई – दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्जुन यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त 1 हजार 80 एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. अशी माहित स्वतः नागार्जुन यांनी ट्विटकरत दिली आहे. नागार्जुन यांनी दत्तक घेतलेल्या वनजमिनीला त्यांच्या वडिलांचं म्हणजेच ‘अक्किनेनी नागेश्वर राव’ यांचं नाव दिलं आहे. या कार्यक्रमा दरम्यान खासदार जे. संतोष कुमार यांच्यासह अक्किनेनी नागार्जुन, अमला, मुलं नागा चैतन्य आणि निखिल आणि इतर कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.
आपल्या ट्विट मध्ये नागार्जुन म्हणतात की….. ‘मला कळविण्यात आनंद होत आहे की, अक्किनेनी कुटुंबाने चेंगिचेरला वन क्षेत्र अर्बन पार्कसाठी दत्तक घेतले आहे आणि याची पायाभरणी केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक रोपं लावण्यात आली.
Many happy returns of the day to chief minister Kcr garu!
Happy to announce the adoption and laying the foundation for the ANR URBAN PARK in chengicherla forest area by the Akkineni family
🙏 to #kcr garu and @MPsantoshtrs for this opportunity #greenindiachallenge #HBDKCR pic.twitter.com/HcGZIiKm5k
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) February 17, 2022
गेल्या बिग बॉस सीझनच्या अंतिम सोहळ्याला मी सांगितले होते की संतोष कुमार यांच्याशी वनभूमी दत्तक घेण्याबाबत चर्चा केली आणि स्टेजवर मी वनभूमी दत्तक घेणार असल्याचं घोषित केलं. आज ते सत्यात उतरलं असून, याचा मला आनंद आहे. वनक्षेत्र वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना याची मोठी मदत मिळणार आहे. या आशयाचे ट्विट अभिनेते नागार्जुन यांनी केलं आहे.