नवी दिल्ली – संसदेवर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला होता असे दिल्ली पोलिसांनीच संबोधित केले असून त्यांनीच याचे राजकारण सुरू केले आहे. विरोधी पक्षांनी याचे राजकारण केलेले नही असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
आज कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताा ते म्हणाले की, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली पोलिसांनीच आपल्या अहवालात याचा उल्लेख दहशतवादी हल्ला असा केला आहे.
वेणुगोपाल म्हणाले की, आम्ही याला दहशतवादी हल्ला म्हटले नाही. आम्ही केवळ सुरक्षेतील स्पष्ट त्रुटींबद्दल आमच्या चिंता मांडल्या, दिल्ली पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे.
गैरवर्तणुकीच्या कारणास्तव संसदेतील १३ खासदारांच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वेणुगोपाल म्हणाले, केंद्र सरकारच्या लोकांनी आम्हाला सांगितले की ही नवीन संसद इमारत जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असेल. पण मग काय झाले? असा सवाल त्यांनी सरकारला केला.
दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी निधी संकलनासाठी ऑनलाइन क्राउडफंडिंग मोहीम सुरू करण्याची घोषणा केली, देशासाठी देणगी, ज्याचा उद्देश समान संसाधन वितरण आणि संधींनी समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी पक्षाला सक्षम करणे आहे. हा उपक्रम महात्मा गांधींच्या ऐतिहासिक टिळक स्वराज निधीपासून प्रेरित आहे.
काँग्रेस नेत्याने सांगितले की क्राउड-फंडिंग मोहीम पक्षाच्या 138 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करेल. त्यामुळे आम्ही देणगीदात्यांना १३८ च्या पटीत पक्षाला देणगी देण्याचे आवाहन करतो असे ते म्हणाले. ही निधी संकलन मोहीम २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्यानंतर बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांना घरोघरी पाठवून हे निधी संकलन केले जाणार आहे.