मुंबई – राज्यातील करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असून आज देखील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 964 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यात आज दिवसभरात 110 रुग्णांची नोंद झाली आहे.
तसेच गेल्या चोवीस तासात एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात गेल्या 24 तासात 72 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24,875 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात सध्या 964 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल ऍक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 164 ऍक्टिव्ह रुग्ण आहे.