मनामा – बहरीनमध्ये बेलारुसशी झालेल्या मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीदरम्यान भारताच्या खेळाडूंनी आपापल्या धर्माच्या परंपरेनूसार सामन्यापूर्वी एकत्रीत प्रार्थना केली. संघातील हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन खेळाडू एकमेकांशेजारी उभे राहुन प्रार्थना करत आहेत, असा फोटो व्हारल झाला आणि त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
जगात केवळ भारत हाच एकमेव देश आहे की जीथे सर्वधर्मसमभाव आहे व विविधतूेन एकता भारतातच दिसते, असा संदेशही या खेळाडूंनी आपल्या कृतीने दिला.
बहरिनच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला बेलारूसविरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात 3-0 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, संघाच्या विजय-पराभवापेक्षा हा फोटो व ही घटना जास्त चर्चिली गेली. या फोटोत दिसत असलेले हे तीन खेळाडू मनवीर सिंग, वीपी सुहैर, होर्मिपम रुइवा आहेत.