पुणे -2014 मध्ये 1 खासदार आणि 8 आमदार, 2017 च्या महापालिकेत 101 नगरसेवक तर, 2019 च्या लोकसभेत पुन्हा 3 लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेला खासदार असतानाही, भाजपला आठही विधानसभा मतदारसंघांत घटलेल्या मतांच्या टक्केवारीचा सामना करावा लागला.
त्यामुळे शहर भाजपसाठी ही धोक्याची घंटा असून वेळीच पक्षाकडून या डॅमेज कंट्रोलकडे लक्ष दिले न गेल्यास येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. तर वडगावशेरीत पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक असतानाही भाजपला पराभव पत्कारावा लागला असून हडपसरमध्येही पराभवाची नामुष्की आली आहे.