मलप्पुरम : केरळमधील मलप्पुरम भागात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एका
17 वर्षीय मुलीवर ३८ नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पर्यंत पोलिसांनी २० नराधमांना अटक केली आहे.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पंडिकक्कड इथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यांत 38 पुरुषांकडून बलात्कार करण्यात आला आहे. याविषयी तिच्या आईनेच आरोप केला आहे. दरम्यान, आईने दिलेल्या तक्ररीवरून आतापर्यंत पोलिसांनी 44 पुरुषांविरूद्ध एकूण 32 गुन्हे दाखल केले असून त्यातील बहुतेकांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आली आहे.
Kerala: 32 cases have been registered against 44 men on charges of rape and molestation of a 17-year-old girl in Pandikkad of Malappuram district. 20 persons have been arrested in connection with the case. (18.1)
— ANI (@ANI) January 19, 2021
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पंडिकक्कड भागात गेल्या 5 वर्षात अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मलप्पुरम पोलिसांनी बलात्काराच्या तीन गुन्ह्यांसह पुरुषांवर 32 गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या माहितीनुसार, मुलगी मलपुरम जिल्ह्यातील पंडिकक्कड भागात एका लहान कॉलनीत आपल्या आईबरोबर राहत होती.
2015 मध्ये आईच्या तक्रारीच्या आधारे स्थानिक पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली दाखल केली होती. त्यावेळी ती आपल्या मित्रांसोबत गेल्याचे कळल्यानंतर काही दिवसानंतर तिला परत घरी आणून सोडण्यात आले होते.परंतु, त्यानंतर तिच्यावर हा सगळा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.