कलगीतुरा रंगला ! लवकरच होणार महाविकास आघाडीचा भांडाफोड

चंद्रकांत पाटील यांनी साधला मविआवर निशाणा

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक झाल्या या निवडणुकीच्या  निकाल समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झालं. याच निकालावरून भाजप आणि मविआमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपाने या निवडणुकीत  सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान  भाजपला मिळालेल्या यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. या वेळी त्यांनी मविआवर निशाणा साधला. 

 

ते म्हणाले,  ‘ येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही पत्रकार घेणार असून या पत्रकार परिषदेत खळबळ जनक खुलासे करणार आहोत.  मुख्यमंत्रांच्या नेतृत्त्वातील मविआ  सरकारने सत्तेचा दुरुपयोग कसा केला, याचा  पोलखोल करणार असल्याची धमकी चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.