गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यामुळे “भुलभुलैय्या 2′ चे प्रॉडक्शन पुढे ढकलले गेले होते. ऑक्टोबर महिन्यापासून या सिनेमाचे शुटिंग सुरू होईल असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात डिसेंबरमध्ये शुटिंगला सुरुवात झाली. त्यामुळे सहाजिकच सिनेमाचे शुटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनलाही उशीर होणार हे निश्चित आहे. या शुटिंगच्या शेड्युलसाठी निर्मात्यांनी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातल्या तारखा निश्चित केल्या आहेत. मात्र या तारखांना तब्बू उपलब्ध नाही.
View this post on Instagram
आता लीड ऍक्ट्रेसच उपलब्ध नसेल तर तिच्यासाठी शुटिंग तर खोळांबून राहू शकत नाही. त्यामुळे या सिनेमातून तब्बूलाच बाहेर करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र हे सहज शक्य होणार नाही. या महिन्यातल्या शेड्युल नंतर थोडे शुटिंग लखनौमध्ये होणार आहे. त्यावेळी तरी तब्बू उपलब्ध रहावी यासाठी हे शेड्युल पुढे ढकलण्याची तयारी सुरू आहे.
View this post on Instagram
“भुलभुलैय्या 2’मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी लीड रोलमध्ये असणार आहेत. कार्तिक आणि कियारा एकाच सिनेमात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. “भुलभुलैय्या’ मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन लीड ऍक्टर होते. मात्र “भुलभुलैय्या 2’हा काही त्याचा सिक्वेल असणार नाही.