तारगाव येथील वाळू चोरीप्रकरणी गुन्हा

पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त

रहिमतपूर   – तारगाव, ता. कोरेगाव येथे रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी सुशांत जालिंदर चव्हाण (वय 24, रा. किरोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्‍टर व दहा हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा मुद्देमाल रहिमतपूर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे

तारगाव येथे रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा व चोरटी वाहतूक होत असल्याची खबर तारगावचे तलाठी पृथ्वीराज पाटील यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास किरोलीचे तलाठी अरुण सावंत, तारगावचे कोतवाल आनंदा गुरव, नलवडेवाडीचे कोतवाल रवींद्र पवार यांच्यासमवेत पाटील यांनी तारगाव येथील निकम आळीत सापळा लावला. त्यावेळी वाळूने भरलेला विना नंबरप्लेटचा निळ्या रंगाचा ट्रॅक्‍टर व ट्रॉलीत वाळू भरून चोरून नेली जात असताना तलाठी पाटील व कोतवाल गुरव यांनी ट्रॅक्‍टरला मोटारसायकल आडवी लावली. त्यावेळी ट्रॅक्‍टरचालक पळून गेला. तलाठी व कोतवालांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाहनाचा पंचनामा केला. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सपोनि घनश्‍याम बल्लाळ तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here