नगर – नगर शहरातील युवकांसमोर रोजगार हा सगळ्यात मोठा समस्येचा विषय आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसने पुढाकार घेत शहरामध्ये काम करावे, असे आवाहन कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी निर्णयांच्या कायद्याला विरोध करण्यासाठीच्या सह्यांच्या मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष दानिशभाई शेख, नगर तालुका युवक कॉंग्रेसचे अक्षयभाऊ कुलट, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहोकले, महिला कॉंग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, चिरंजीव गाढवे, प्रवीणदादा गीते, प्रसाद शिंदे, अरुण धामणे, शानूभाई शेख, इमरान बागवान, वाहिद शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सह्यांच्या मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी नगर शहर आणि नगर तालुका युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक देखील यावेळी शहर कॉंग्रेस कमिटी कार्यालयात पार पडली. यावेळी नगर शहर एमआयडीसी परिसरातून 10,000 कामगारांच्या सह्यांचे निवेदन तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. आ. तांबे यांनी पहिली स्वाक्षरी करत या मोहिमेचा प्रारंभ यावेळी केला.
आ. तांबे म्हणाले, कामगारांच्या गळचेपीचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अशा वेळी त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आधार देण्याची भूमिका आपण घेतली आहे. यासाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचत त्यांचा आवाज कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी आ. तांबे यांनी केले.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभराबरोबरच नगर शहरात देखील आम्ही ही मोहीम राबवणार आहोत.
यावेळी प्रशांत वाघ, ऍड. अजित वाडेकर, शंकर आव्हाड, देवेंद्र कडू पाटील, गणेश आपरे, गणेश लांडगे, अंकित सोनवणे, भाऊसाहेब कुलाल आदिवासी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.