नवी दिल्ली – अॅमेझॉन कंपनीने इंडियन रेल्वे केटरिंग अँड ट्युरिझम कॉर्पोरेशनबरोबर सहकार्य करार केला आहे. त्यानुसार सध्या अॅमेझॉनच्या मोबाइल वेबसाईटवरून व अँड्रॉइड ऍपवरून नागरिकांना रेल्वेची तिकिटे खरेदी करता येतील.
या अॅपमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात येणार असल्याचे अॅमेझॉन म्हटले आहे. जर ही सेवा सुरळीत झाली तर बऱ्याच ग्राहकांना याचा लाभ होऊ शकेल, असे समजले जाते. ऍमेझॉन ऍपचा वापर करणे नागरिकांना अंगवळणी पडल्यामुळे या माध्यमाचा तिकीट बुकिंगसाठी वापर वाढू शकतो.