नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे कल समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस चांगलीच आघाडी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनी एक व्हिडिओ ट्विट करत, “मी अजिंक्य आहे, मला विश्वास आहे, आणि आज मी थांबणार नाही. “असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्यांच्याबरोबर अनेक नेते देखील असल्याचे पाहायला मिळत आहे.
#WATCH | Fireworks at AICC office in Delhi as the party crosses halfway mark in #KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/zNsy7OzPEl
— ANI (@ANI) May 13, 2023
अशात काँग्रेस नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान कर्नाटकात मतमोजणी सुरू असताना दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर विजयाचे सेलिब्रेशन सुरू होते. मात्र एका दुर्घटनेमुळे ते भलतेच महागात पडले असते. काँग्रेस मुख्यालयासमोर विजय साजरा करत कार्यकर्ते आणि नेत्यांनी फटाके फोडले.
यावेळी फटाके फोडतांना ते थोडक्यात बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. खरंतर काँग्रेस नेत्याने हातात पेटता फटाका हातात घेतला होता. मात्र त्यांचा तोल गेला आणि फटाक्यांनी भरलेला संपूर्ण बॉक्स जमिनीवर पडला. जमिनीवर पडूनही फटाके फुटणे सुरूच होते. त्यातील एक फटाका काँग्रेसच्या नेत्याच्या चेहऱ्याजवळ फुटला. सुदैवाने फटाका त्यांच्या जवळून वर गेला अन्यथा त्यांचा संपूर्ण चेहरा जळला असता.