चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा झोपेत गळा चिरून निर्घृण खून

दोघेही राहत होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ; चाकूने गळा कापून तिचा निर्घृण खून

शिरूर : वाडा कॉलनी शिरूर येथे प्रियसी बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असणाऱ्या तरुणाने प्रियसी वर चारित्र्याचा संशय घेऊन चाकूने गळा कापून तिचा निर्घृण खून करून, आरोपी कारेगाव येथे कामाला गेला त्यानंतर आरोपींनी स्वतः पोलीस स्टेशन येथे येऊन खुनाची कबुली दिली असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

ही घटना 27 जुलै मध्यरात्री पावणे दोन वाजता  घडली आहे. सारिका सुदाम गिरमकर ( वय 30, रा. कुऱ्हाडवाडी, निमोणे, ता..शिरूर,पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड ( वय 33 , रा. वाडा वसाहत शिरूर, मूळ रा. शिंदोडी,शिरूर) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वाडा कॉलनी येथील घर मालक बबन पर्वतराव शेटे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी आणि दिलेल्या माहितीवरून दत्तात्रय गायकवाड व सारिका गिरमकर हे दोघेजण  वाडा कॉलनी येथील फिर्यादी शेटे यांच्या खोलीमध्ये अनेक दिवसापासून भाडे तत्वावर राहत होते. परंतु काही दिवसापासून दत्तात्रय गायकवाड हा सारिका हिच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला. यावरून दोघात अनेकवेळा भांडणे झाली होती. चारित्र्याच्या संशयावरून 27 जुलै मध्ये रात्री पावणे दोन वाजता दत्तात्रेय गायकवाड याने झोपेतच सारिका हिचा चाकूने गळा कापून निर्घुणपणे खून केला.

खून केल्यानंतर दत्तात्रय गायकवाड कारेगाव येथे कंपनीत कामाला निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा सकाळी शिरूर येथे येऊन शिरूर पोलीस स्टेशन येथे हे गेला व तेथे त्याने सारिका चा खून केल्याची कबुली दिली. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे हे करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.