मुंबई – एचडीएफसी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पुरी यांनी त्यांच्याकडील बॅंकेचे 74 लाख शेअर 842 कोटी रुपयांना गेल्या आठवड्यात विकले आहेत.
आता पुरी यांच्याकडे एचडीएफसी बॅंकेचे केवळ 0.01 टक्के शेअर शिल्लक आहेत. 25 वर्षांपासून पुरी एचडीएफसी बॅंकेत आहेत. त्यांना वेळोवेळी विविध दरावर हे शेअर देण्यात आले होते. पुरी यांचा पगार भारतातील सर्व बॅंकांच्या प्रमुखांपेक्षा जास्त आहे. पुरी यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेने उत्तम कामगिरी केली. 2020 मध्ये आतापर्यंत या बॅंकेच्या शेअरचा भाव 40 टक्क्यांनी वाढला आहे.