नवी दिल्ली : – स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बऱ्याच पेन्शनधारकांची खाती आहेत. या खातेदारांना पेन्शनसंदर्भातील माहिती उपलब्ध व्हावी याकरिता स्टेट बॅंकेने पेन्शन खाते धारकांसाठी नवी वेबसाईट सुरू केली आहे.
एसबीआय पेन्शन सेवा ( SBI Pension Seva ) असे या वेबसाईटचे नाव आहे. पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यासंदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी बॅंकेच्या शाखा कार्यालयात जाण्यास मर्यादा येतात. त्यामुळे आता हे पेन्शनधारक वेबसाइटवरून त्यांना आवश्यक असलेली माहिती पाहू शकतात. ही वेबसाइट वापरण्यास सुलभ आहे असे स्टेट बॅंकेने म्हटले आहे.