पाचगणी (प्रतिनीधी) : केळघर घाटातील काळ्या कड्यानजीक कर्नाटकातील शंकेश्वर येथील शाळेच्या सहलीच्या बसचा ब्रेकफेल झाला. सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस डोगरांच्या बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. बस जर तीव्र दरीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली होती.
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार शंकेश्वर येथील माध्यमिक शाळेची बस केए 23 एफ 1085 ही बस महाबळेश्वर पर्यटनासाठी सहलीकरीता आली होती. महाबळेश्वर दर्शन करुन केळघर घाटात जात असताना काळ्याकड्याच्या तीव्र वळणाच्या जवळ बसचा ब्रेक निकामी झाला. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत तीव्र दरीत कोसळणारी बस डोगरांच्या बाजूला घातल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली असल्साच चित्र घटना स्थळी दिसून येत आहे. सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेत जीवीतहानी झाली नाही.