लंडन – जगाच्या पाठीवर सर्वच धर्मांमध्ये कोठे ना कोठे सतत चमत्कार झाल्याचे दावे केले जात असतात ख्रिश्चन धर्मातही सतत असे दावे होत असतात आता ग्वाटेमाला देशातील एका शहरामध्ये घडलेली घटना याच निमित्ताने चर्चेत आली आहे.
ग्वाटेमालातील एका शहरामध्ये एका मोठ्या पुस्तकाच्या दुकानाला आग लागली आणि संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले या दुकानातील सर्व पुस्तकेही जळून खाक झाली पण दुकानात विक्रीला असलेली बायबल मात्र आश्चर्यकारकरित्या सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे ला मिलिटा नावाच्या या बुक स्टोअरला आग लागली होती आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण तोपर्यंत संपूर्ण बुक स्टोअर जळून खाक झाले होते.
आग विझवण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आग विझवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या दुकानांमध्ये बायबल मात्र आश्चर्यकारक रित्या सुरक्षित अवस्थेत आढळले ग्वाटेमाला देशातील चिंकूमिला या शहरात ही घटना घडली असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे ज्या प्रकारे देवाने या बुक स्टोअर मधील बायबलचे रक्षण केले त्याच प्रकारे या बुक स्टोअरच्या मालकाला या नुकसानीतून वर येण्याची शक्ती देवाने द्यावी अशी प्रार्थना करण्यात येत आहे.