CBI Raids TMC Former MP Mahua Moitras House| पश्चिम बंगालमधील टीएमसी पक्षाच्या नेत्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या कोलकात्यातील घरी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा टीएमसी नेते महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर आज कॅश फॉर क्वेरी प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीने याअगोदर 19 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. महुआ यांना संसदेच्या एथिक्स कमिटीने दोषी ठरवले होते. त्यावर महुआ यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हंटले होते.
महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध एफआयआरची नोंद CBI Raids TMC Former MP Mahua Moitras House|
लाचलुचपत प्रतिबंधक संस्था लोकपालच्या सूचनेनुसार सीबीआयने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध पैसे घेण्याबाबत प्रश्न विचारल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणातील तक्रारींच्या सर्व पैलूंची चौकशी करून सहा महिन्यांत अहवाल सादर करा, असे लोकपालने सीबीआयला सांगितले.
खासदार या नात्याने मोईत्रा यांच्यावर लावण्यात आलेले आरोप ठोस पुराव्यावर आधारित असून ते अतिशय गंभीर आहेत. अशा स्थितीत सत्य शोधण्यासाठी त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे लोकपाल खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले.
भाजप खासदार निशिकांत दुबेंचा महुआ मोईत्रांवर आरोप CBI Raids TMC Former MP Mahua Moitras House|
मागील वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रांवर आरोप केला होता. महुआ यांनी महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारले, असा आरोप दुबे यांनी केला होता. या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. मात्र सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा टीएमसी उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवणार आहेत.