महाड – रायगड येथील तुडील भेलोशी परिसरात रस्त्यालगत असण्याऱ्या पायवाटेवरती महिला सरपंच मिनाक्षी मनोहर खिडबिडे ( वय 48 ) यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने निघृण खुन केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत फाट्यांची भारी पाहिली. मात्र त्या ठिकाणी कोणीही दिसले नाही, त्यामुळे त्याने इकडे तिकडे शोध घेतला असता. यावेळी त्याला महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. दरम्यान, अज्ञात इसमाने डोक्यात फाटा मारून त्यांचा खुन केला असुन मृतदेह विवस्त्र असल्याने तिच्यावर अतिप्रसंग अगर बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे. महाडचे पोलिस सहअधिक्षक, तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु करण्यात आला आहे.