मुंबई – मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, अभिनेत्री ‘मलायका अरोरो’ आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे. नुकतंच पार पडलेल्या एका ख्रिसमस पार्टी दरम्यान मालयकाला स्पॉट करण्यात आलं.
या पार्टीत मालयकाने जबरदस्त एंट्री घेत सर्वांचेच लक्ष वेधलं होतं. या पार्टीसाठी अभिनेत्री मालयकाने गुच्चीचा व्हेलवेटचा ग्रीन ड्रेस घातला असून, या ड्रेसची किंमत 98 हजार इतकी आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पार्टीवेळी जेव्हा मलायका आपल्या बॉय फ्रेंड सोबत म्हणजेच अभिनेता ‘अर्जुन कपूर’ बरोबर गाडीतून उतरत होती तेव्हा तिच्या हाय हिल्समुळे तिची चांगलीच फजिती झाल्याचं दिसून आलं. हाय हिल्समुळे मालयकाचा तोला गेला आणि ती पडता पडता वाचली.
मग काय क्षण पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या मालयकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.