भाजपचा जाहिरनामा म्हणजे, ‘सिर्फ मोदी ही मोदी

मुंबई – २०१४ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. आता पुन्हा एकदा भाजप पक्षाकडून प्रचंड बहुमत मिळविण्यासाठी मोदी यांचा चेहरा समोर केला जात आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून  काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच दोन्ही पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजप पक्षाने जाहिरनाम्यात सर्वकाही मोदी असचं सूचित  केले आहे. तर उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, सामान्य नागरिक आणि गरिबांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे. तर भाजपने मध्यमवर्गीय आणि राष्ट्रवाद यावर भर दिला आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्याचे कव्हरपेज चर्चेचा विषय ठरले आहे भाजप पक्षाच्या जाहिरनाम्यातील कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो घेण्यात आला आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष किंवा एकाही ज्येष्ठ नेत्याचा फोटो या जाहीरनाम्यावर दिसत नाही. तर जनता देखील कुठेही नाही, यामुळे भाजपच्या जाहिरनामा म्हणजे, ‘सिर्फ मोदी ही मोदी’, अशी चर्चा रंगत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.