पुणे – उमेदवारांची संख्या वाढल्याने लागणार दोन ईव्हीएम

पुणे – पुणे व बारामती लोकसभा मतदार संघात 15 पेक्षा अधिक उमेदवार उभे असल्याने या दोन्ही मतदारसंघात दोन ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीन) मशीन वापरले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला 4 हजार 369 जादा ईव्हीएम मशीनची आवश्‍यता भासणार आहे.

ईव्हीएम मशीनवर पंधरा उमेदवार आणि एक “नोटा’ असे एकूण 16 बटण असतात. त्यामुळे एका ईव्हीएमवर जास्तीत जास्त 15 उमेदवारांची नावे निश्‍चित करता येतात. पुणे लोकसभा मतदारसंघात 31 तर बारामतीमधून 18 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे मतदारसंघात 1 हजार 997 मतदान केंद्र तर बारामती मतदारसंघात 2 हजार 372 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएम ठेवले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.