हरभरे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जाण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. हरभरे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हरभऱ्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह मोठ्या प्रमाणात मिळतात. मोड आलेल्या हरभाऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, आणि त्याबरोबरच फॉस्फोरस,पोटॅशियम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
1. हरभरे फायबरयुक्त असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते. हरभरे भिजत घातलेले पाणी फेकून न देता त्याचे प्राशन करावे.
2. जर तुम्ही भाजलेले हरभरे गुळासोबत खाल्ले तर तुमची आर्यनची गरज पूर्ण होते. शरीराला ऊर्जा मिळते.
3. हरभऱ्याचं पाणी हे चेहऱ्यासाठी उत्तम आहे. भिजवलेल्या पाण्याने तुम्ही चेहरा धुतल्यास तो उजळतो.
4. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रात राहण्यासाठी भिजवलेले हरभरे फायदेशीर ठरतात.
5. हरभरामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये समावेश करू शकता.
6. हरभरा डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यात बीटा कैरोटीन तत्व असतात. डोळ्यांच्या नसांना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवत असतात. त्यामुळे नजर चांगली होते.
7. मोड आलेल्या हरभरामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन “सी’ असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
8. जर प्रमाणात हरभराच्या कोणत्याही प्रकाराचं सेवन केल तर ते फायदेशीर ठरतं. पण हरभरा जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास शरीरातील आताड्यांना त्रास होऊ शकतो. ज्यामुळे पोटात गॅस होण्याची तक्रार उद्भवू शकतो.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886