बंगळुरू: सोमवारी देशात लॉकडाउन ४.० अंमलात आला आहे. कर्नाटक सरकारनेही या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राज्यातील सरकारी आणि खासगी बसगाड्यां चालण्यास परवानगी दिली आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन ४.० साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले. कन्टेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन काटेकोरपणे पाळले जाईल. कारण कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. तथापि, इतर क्षेत्रांना या बंदीमधून सूट देण्यात आली आहे. कन्टेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांना सूट दिली जाईल.
राज्यात सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, राज्यांतर्गत रेल्वेगाडी चालविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. परंतु गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूतील लोकांना राज्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खासगी बसगाड्यादेखील चालवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. फक्त 30 प्रवाशांना बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार असून प्रत्येकाने मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक असेल. तसेच बसचे भाडे वाढवले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आंतरराज्यीय वाहतुकीस मान्यता दिली जाणार नाही, केवळ आपत्कालीन परिस्थितीतच परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे वाहन आणि टॅक्सीसुद्धा चालवण्यास परवानगी देण्यात आली. परंतु चालकांसोबत केवळ तीन लोक प्रवास करू शकतील. ड्रायव्हरसह चार लोक मोठ्या कॅबमध्ये प्रवास करू शकतात.
ट्रेन राज्यात 31 मे पर्यंत धावतील. तसेच सलून उघडण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आणि उद्याने सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत उघडली जातील.
मुख्यमंत्री म्हणाले, शॉपिंग मॉल्स आणि सिनेमा हॉल वगळता सर्व दुकाने उघडली जाऊ शकतात. रात्रीची कर्फ्यू संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळेत सुरू राहणार असून रविवारी तेथे संपूर्ण लॉकडाउन होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.