टीआरपी प्रकरणी पाच जणांचे जामीन अर्ज फेटाळले

मुंबई – टीआरपी घोटाळा प्रकरणी चॅनेल मालकासह पाच जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे. तसेच एका आरोपीने साक्षीदार होण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आरोपी उमेश मिश्रा याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणी 7 ऑक्‍टोबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचे अटकसत्र सुरु झाले. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी अभिषेक कोलवडे याला आज पोलीस कोठडी देण्यात आली.

टीआरपी घोटाळा प्रकरणी प्रारंभी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचा पोलीस रिमांड संपल्यावर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यानंतर या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. त्यावर आज किल्ला कोर्ट येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी निकाल दिला.

दरम्यान, टीआरपी प्रकरणात आता महत्वाचे धागेदोरे उलगडले जात आहेत. उमेश मिश्रा याने आता साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे त्याला जामीन मिळाला आहे. हंसा रिसर्च कंपनीच्या बॅरोमिटरमध्ये फेरफार कशा प्रकारे होते, त्यात कोणकोण सहभागी आहे, “बार्क’चा यात काही आहे का? अशा अनेक मुद्यांचा आता उलगडा होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.