वॉशिंग्टन : मध्यपूर्व आशियायी देशांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेला प्रस्ताव अरब लीगने फेटाळून लावला आहे. आखाती देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची कैरो इथे बैठक झाली. या बैठकीनंतर लीगने निवेदन प्रसिद्ध करून ट्रम्प यांच्या प्रस्तावात पॅलेस्टिनी नागरिकांचे मूलभूत हक्क आणि आकांक्षांना, स्थान दिलेले नसल्याचे म्हटले आहे. या प्रस्तावात शांतता प्रक्रियेसाठी आवश्यक मुद्दे डावलेले गेले आहेत असे अरब लीगने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत, मध्यपूर्व आयिशाई देशांमधला तणाव संपुष्टात यावा यासाठीच्या उपोययोजना सुचवणाऱ्या प्रस्तावात, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन आणि या क्षेत्रातली शांतता केंद्रस्थानी असायला हवी, तरच तो प्रस्ताव स्विकारला जाईल असे अरब लीगने स्पष्ट केले आहे.