न्यूयॉर्क – उत्तर कोरियाकडून सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांचे उल्लंघन झाले की नाही, हे तपासण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठवण्याची मागणी करणारा संयुक्त राष्ट्रात मांडलेला ठरावाचा प्रस्ताव रशियाने नकाराधिकार वापरून फेटाळला आहे.
उत्तर कोरियाने एकापाठोपाठ एक अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे युक्रेनने म्हटले होते.
त्यामुळे हा ठराव मांडण्यात आला होता. ठरावाच्या बाजूने सुरक्षा परिषदेतील १५ पैकी १३ देशांनी मतदान केले, तर चीन मतदानाच्यावेळी तटस्थ राहिला.