कर्जाचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार

सातारा – पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी वर्षानिमित्त सातारा पालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाद्वारे व्यवस्थापन कक्षातून शहरातील लघु उद्योजक नागरिक, महिला बचतगट यांना कर्ज वितरीत करण्यापूर्वीच कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांचे फॉर्म भरण्यासाठी आणि मंजुरीसाठी पालिका कर्मचारी आणि खासगी कर्मचारी यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरु आहेत.

कर्ज वितरीत करण्यापूर्वी लाभार्थ्यासंबंधी माहिती पालिकेकडून संकलित करणे क्रमप्राप्त असताना पालिकेच्या बारनिशित कर्ज मागणीचे अर्ज थेट दाखल झाल्याने असे अर्ज मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी बाजूला केले असून अद्याप या प्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र प्रत्यक्षात हे अर्ज पालिकेच्या बाहेर गेले कसे? कोणाच्या बचत गटांना 10 हजारांचा फिरता निधी पालिका देते.

पालिकेकडून दारिर्दय रेषेखालील 3303 कुटुंबांची नोंद करण्यात आली आहे, त्यापैकी व्यक्तिगत (स्वयम रोजगार) 37 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून 2112250 रुपये कर्ज 22 बॅंकांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. बचत गटांना 15 लाखांपर्यंत कर्ज देत त्यांची बॅंक खाते जोडणी करून 10 हजारांचा फिरता निधी ही वितरीत करण्यात आला आहे. तर 65 लाभार्थ्यांना प्रशिक्षणानंतर खासगी नोकरीसाठी मदत करण्यात आली आहे.

पालिकेत करारी पद्धतीवर कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांना दोन ते तीन हजार रुपयांना अर्जाची विक्री करण्यात आली असून ही प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रकरण निहाय 25 हजार रुपये प्रत्येकी मागितले जात आहेत. त्याकरिता लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती पालिकेच्या बारनिशी विभागात विहित नमुन्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी मागास, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची लुट करणाऱ्या आणि पालिकेतून असे प्रकार राजरोसपणे चालविणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

पं. दिनदयाळ उपाध्याय योजनेतून कर्ज घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वी पालिकेत अर्ज केला होता. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्याने माझ्याशी संपर्क साधत अर्ज भरण्यासाठी व प्रकरण मंजूर करण्याचे 2,500 रुपये घेतले. तसा मला एसएमएसही आला. आता बारनिशीतून आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही, असे सांगत पालिका कर्मचारी बोळवण करत आहेत. “पैसे खाणारे तुपाशी आणि माझ्यासारखे गरजू लाभार्थी उपाशी’ यावर तातडीने कारवाई करुन मार्ग काढावा.

निलम गायकवाड, सातारा. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.