कृष्णा बॅंकेला 11 कोटी 26 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले

कराड – नुकत्याच संपलेल्या सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये कृष्णा सहकारी बॅंकेला 11 कोटी 26 लाख 75 हजार रुपये एवढा ढोबळ नफा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा बॅंकेच्या ढोबळ नफ्यात 3 कोटी 45 लाख 32 हजार रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन तथा श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे. यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बॅंकेची स्थापना केली. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बॅंकेच्या 31 मार्च 2019 अखेरच्या एकूण ठेवी 314 कोटी 16 लाख रुपयांच्या असून, 201 कोटी 17 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बॅंकेचा एकूण व्यवसाय 515 कोटींच्या वर झाला असून, बॅंकेच्या सी.डी. रेशोचे प्रमाण 64.04 टक्के आहे. त्याचप्रमाणे बॅंकेचा ढोबळ एन. पी. ए. 5.30 टक्के असून, निव्वळ एन. पी. ए. शून्य टक्के राखण्यात बॅंक यशस्वी झाली आहे.

बॅंकेचे एकूण भागभांडवल 561 कोटी असून, 344 कोटींहून अधिक स्वनिधी शिल्लक आहे. तसेच 144 कोटींची गुंतवणूक आहे. तसेच बॅंकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुविधा, एस. एम. एस. बॅंकींग, ई-कॉमर्स, आर. टी. जी. एस./ एन. ई. एफ. टी., एन. ए. सी. एच. या सारख्या अत्याधुनिक सुविधा सुरु केल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यात 17 शाखांच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देणाऱ्या या बॅंकेने गेल्या आर्थिक वर्षात कराड येथील मार्केट यार्ड व उंब्रज येथे दोन नवीन शाखा सुरु केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.