नवी दिल्ली – कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन लोकसभेत चांगलाच गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला. हा गदारोळ इतका वाढला की खासदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत शुक्रवारी आक्षेप घेतला.
देशाच्या पंतप्रधानांबाबत एखादा माणूस ही भाषा कशी काय वापरु शकतो? लोक पंतप्रधानांना लाठीने मारतील, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. राहुल गांधी यांचे वडीलही देशाचे पंतप्रधान होते. अशा माणसाने तरी पंतप्रधानपदाचा आदर ठेवायला हवा, असेही हर्षवर्धन यांनी राहुल गांधींना सुनावले.