तरणजितसिंग संधुंनी ट्रम्प यांना सादर केले नेमणूक पत्र

वॉशिंग्टन – भारताचे अमेरिकेतील नवनियुक्त राजदूत तरणजितसिंग संधु यांनी गुरूवारी व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना आपली नियुक्ती पत्रे सादर केली.

व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिस मध्ये झालेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी संधु यांचे स्वागत केले. यावेळी ट्रम्प यांनी भारताशी व पंतप्रधान मोदींशी असलेल्या आपल्या मैत्रसंबंधांचा उल्लेख करून त्यांच्या बरोबर झालेल्या अनेक भेटींचा उल्लेख केला असे भारतीय दूतावासातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील गेल्या तीन वर्षांतील संवादामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर पोहचले असल्याचे संधु यांनी यावेळी नमूद केले. हे संबंध अधिक दृढ करण्याचेच काम आपण करू असेही संधु यांनी यावेळी नमूद केले. अमेरिकेचे दक्षिण अशिया आणि मध्य अशिया विभागाचे सहायक सचिव ऍलिस वेल्स यांनीही संधु यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.