‘सचिन पायलट यांच्याबाबत ‘ते’ वक्तव्य अनवधानातून’

नवी दिल्ली – राजस्थानातल्या कॉंग्रेस सरकारमध्ये पायलट आणि गेहलोत गटांमध्ये सत्ता संघर्षामध्ये सचिन पायलट आता भाजपमध्ये आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस पी.एल. पुनिया यांनी केले होते. या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. पण ते वक्तव्य अनवधानातून झाले असल्याचे स्पष्टीकरण पुनिया यांनी दिले आहे.

पी.एल. पुनिया यांनी म्हंटले कि, एका वृत्तसंस्थेने मला ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. याचे उत्तर देताना माझ्याकडून चुकून सचिन पायलट यांचे नाव निघाले. ही एक मानवी चूक आहे. सचिन पायलट यांनी स्वतः ते भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी राजस्थानमधील सत्तासंघर्षाबाबत पी.एल. पुनिया यांना विचारले प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सचिन पायलट सध्या भाजपमध्ये आहेत. काँग्रेसप्रती भाजपची भूमिका सर्वानाच माहिती आहे. आम्हाला भाजपकडून कोणतेही प्रमाणपत्र नको आहे. काँग्रेसमध्ये सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो, असे त्यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.