मुंबई : शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि शिवेसेनेला टोला लगावला आहे.
यैष्यी बोलताना शरद पवार म्हणाले, “आम्हालाही हे आत्ताचं कळलं की महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही.
पुढे बोलताना त्यांनी,”आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद” असे म्हटले.
या जाहिरातीमुळं भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळं मोठ्या टीकेनंतर शिवसेनेला पुन्हा जाहिरात देत खुलासा द्यावा लागला होता, यावर भाष्य करताना पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या जाहिरातील सर्व पेपरना दिल्या आहेत. प्रिंट मीडियाच्या दृष्टीनं ही लाभदायक गोष्ट ठरली आहे.