मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच तिला क्रिकेटर ऋषभ पंतवरून देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. आता पंत आणि उर्वशी पुन्हा एकदा चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचे कारण ठरले आहे एक पोस्टर…
दोन दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात पंतने हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान एका तरुणीने हातात एक पोस्टर धरले आहे. त्यावर ‘थँक गॉड उर्वशी इथे नाही,’ असे लिहिले आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या पोस्टरवर उर्वशीने नाराजी व्यक्त केली आहे.
उर्वशीने या व्हायरल पोस्टरवर कमेंट करत ‘का?’, असा सवाल केला आहे. सध्या तिच्या या कमेंटवरून तिला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे. यावर एकाने लिहिले, “ऋषभ भैय्या को नजर लग जाती है ना.” तर दुसर्याने लिहिले, “तिने रौतेलाचा उल्लेख केला नाही, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करा.”
View this post on Instagram
दरम्यान, यापूर्वी उर्वशी आणि ऋषभ हे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अनेकदा ती RP या नावाने पोस्ट शेअर करत असते. यावरून उर्वशी ऋषभला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच अनेकदा ती ऋषभ पंतची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्येही दिसली होती. ऋषभ पंतचा अपघात झाला होता, तेव्हा सुद्धा त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या कोकिलाबेन रुग्णालयाचा फोटोही तिने पोस्ट केला होता.