मुंबई – रोहित शेट्टीच्या खतरनाक स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीचा 13वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या शोमध्ये टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना स्टंट करावे लागतात. शो दरम्यान जो आपल्या भीतीवर पूर्णपणे मात करतो तो खतरों का खिलाडी नंबर 1 बनतो. शोच्या स्पर्धकांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. बिग बॉस फेम एमसी स्टॅनने या शोमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याचे समजते.
बिग बॉस 16 चा विजेता, एमसी स्टॅनने रोहित शेट्टीचा शो करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यावेळी रॅपर एमसी स्टॅनला मोठी रक्कम ऑफर करण्यात आल्याचे देखील समजते. मात्र जीवावर बेतेल असा खेळ करण्यास स्टॅनने नकार दिल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एका हिंदी मीडियाने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.
हालाकीच्या परिस्थितून एमसी स्टॅनने मिळवलेले यश सर्वांना माहिती आहे. यासह रॅपवर असलेले त्याचे प्रेम आणि त्याला मिळालेले प्रचंड फॅनफॉलोविंग यामुळे तो प्रत्येक शोमध्ये खूप चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये त्याने केलेला खेळ पाहून त्याचे फॅनफॉलोईंग प्रचंड वाढले.सध्या तो स्वतःचे शोज करत असला तरी प्रेक्षकांना पुन्हा त्याला टीव्हीवर पाहण्याची इच्छा आहे.
नुकतंच सुंबुल तौकीर खानने खतरों के खिलाडी सीझन 13 ला देखील नकार दिला होता. सुंबुलला भरपूर पैसे ऑफर करण्यात आले होते पण त्याने देखील स्टंट करण्याच्या या शोला नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या शोच्या अंतिम स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियंका चहर चौधरी आणि सौंदर्या शर्मा अशी नावे चर्चेत आहेत मात्र तरीही एमसी स्टॅनने या शोमध्ये खेळण्यास का नकार दिला असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.
समोर आलेल्या माहितिन्सुअर हा शो 17 जुलै रोजी कलर्स टीव्हीवर सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच रात्री 9:30 पासून प्रसारित होईल. तसेच वूट ऍपवर खतरों के खिलाडी 13 ऑनलाइन देखील पाहता येणार आहे. या वेळी या शोचे शूटिंग केपटाऊनमध्ये नाही तर अर्जेंटिनामध्ये केले जाणार आहे, जिथे सीझन 9 आणि सीझन 7 चे शूटिंग करण्यात आले होते.